Chakan : चाकणला कांद्याच्या आवकेत घट टोमॅटो  व वाटाण्याच्या दरात घसरण

चाकण बाजारभाव - रविवार, दि. 27ऑगस्ट, 2023

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याच्या ( Chakan) आवकेत मोठी घट झाली आहे. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची भरपूर आवक होऊन भाव गडगडले आहेत. फळभाज्यांच्या बाजारात टोमॅटो व वाटाण्याच्या दरात घसरण झाली आहे. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्यांच्या संख्येत घट होवूनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 2 कोटी, 90 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या ( Chakan) तुलनेत ही आवक 500 क्विंटलने घटल्याने भावात 250 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 2300 रुपयांवरून 2550 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. बटाट्याला 2000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जळगाव भुईमुग शेंगां व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरच स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 65 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2 हजार 500 रुपयांपासून ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत भाव ( Chakan) मिळाला. 

 

Maharashtra : देशात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस, राज्यावरही दुष्काळाचे सावट

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 1500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2550  रुपये, भाव क्रमांक 2. 1800  रुपये, भाव क्रमांक 3.1500 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2000 रुपये, भाव क्रमांक 2. 1600 रुपये, भाव क्रमांक 3. 1300 रुपये.  फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 330 क्विंटल ( 2500 ते 3500 रू. ), कोबी – 208 क्विंटल ( 600 ते 1000 रू.), फ्लॉवर – 225 क्विंटल ( 500 ते 1500 रु.), वांगी -96  क्विंटल (1500 ते 2500 रु.), भेंडी – 60क्विंटल ( 1000 ते 2000रु.), दोडका – 72 क्विंटल ( 2000ते 3000 रु.), कारली – 82 क्विंटल ( 1500 ते 2500 रु.), दुधीभोपळा – 64 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), काकडी – 78 क्विंटल ( 500 ते 1200 रु.), फरशी – 60 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), वालवड – 72 क्विंटल ( 2000 ते 4000 रुपये), गवार – 60 क्विंटल ( 4000 ते 6000 रू.), ढोबळी मिरची – 375 क्विंटल (2500 ते 4500रु.), चवळी – 28 क्विंटल (2000 ते 3000 रुपये.), वाटाणा – 100 क्विंटल ( 5000 ते 6000 रु.), शेवगा – 35 क्विंटल ( 2000 ते 3000 रुपये ), गाजर – 115  क्विंटल ( 1500 ते 2500रु.).

पालेभाज्या –  

चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 9 हजार 600 जुड्या ( 1000 ते1500 रुपये,), कोथिंबीर – एकूण 38 हजार 500 जुड्या ( 100 ते 400 रुपये), शेपू – एकूण 4 हजार, 700   जुड्या ( 400 ते 600 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 650 जुड्या (500 ते 900)

  जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 32 जर्शी गाईपैकी 18 गाईची विक्री झाली.(20000 ते 50000 रुपये,), 90 बैलांपैकी 78 बैलांची विक्री झाली ( 15000 ते 30000 रुपये.), 110 म्हशीपैकी 95 म्हशींची विक्री झाली. ( 30000 ते 80000 रु.), 3950 शेळ्या – मेंढ्यापैकी 3510 शेळ्यांची विक्री झाली. ( 2000 ते 25000 रु.), चाकण येथील जनावरांच्या बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांचे भाव स्थिर ( Chakan) राहिले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.