Maharashtra : देशात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस, राज्यावरही दुष्काळाचे सावट

एमपीसी न्यूज – एक जून ते 23 ऑगस्टपर्यंत च्या पावसाच्या आकडेवारीनुसार देशात सरासरीपेक्षा ( Maharashtra) सात टक्के कमी पाऊस पडला आहे. या काळात देशात सरासरी 643 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 597.8 मिमी पाऊस पडला आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा झाला तर मुंबई व कोकण वगळता इतर भागात सरासरीच्या 8 मीमी कमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात 1 जून ते 26 ऑगस्ट या काळात सरासरी 772.4 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 709.5 मिमी म्हणजे सरासरीपेक्षा आठ मिमी कमी पाऊस झाला आहे. विभागनिहाय विचार करता मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के कमी, मराठवाडय़ात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी, विदर्भात सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सांगली आणि जालन्यात अत्यल्प पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

Pune : पुण्यात आज पार पडणार जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात 560 मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 21 टक्के कमी 444.3 मिमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नगरमध्ये 34 टक्के, धुळय़ात 23 टक्के, जळगावात 14 टक्के, कोल्हापुरात 14 टक्के, नंदुरबारमध्ये 21 टक्के, नाशिकमध्ये 9 टक्के, पुण्यात 17 टक्के, सांगलीत 45 टक्के, साताऱ्यात 36 टक्के आणि सोलापुरात 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली ( Maharashtra) आहे.

विभागनिहाय विचार करता ईशान्य भारतात सरासरीपेक्षा 19 टक्के कमी पाऊस पडला आहे. ईशान्य भारतात 1004.1 मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात 809.8  मिमी पाऊस पडला आहे. उत्तर भारतात सरासरी पेक्षा आठ टक्के अधिक पाऊस आहे. 444 मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 479.3 मिमी पाऊस पडला आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा चार टक्के कमी पाऊस पडला आहे. 729.8 मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 699.3 मिमी पाऊस पडला आहे. दक्षिण भारतात सरासरीपेक्षा 15 टक्के कमी पाऊस आहे 512.3 मिमी सरासरी पाऊस होतो, प्रत्यक्षात 437.2 मिमी पाऊस पडला ( Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.