Chinchwad : ‘मन की बात’मुळे समाजासाठी काम करण्याची प्रेरणा –  शंकर जगताप

एमपीसी न्यूज – ‘‘संकल्प के सूरज चांद पर भी उगते हैं.. ’’ अशा शब्दांत ( Chinchwad) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चांद्रयान- 3’ मोहीमेत यशस्वी झालेल्या शास्त्राज्ञांचे कौतुक केले. ‘मन की बात’ मुळे समाजासाठी आणखी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 104 व्या भागाचे शक्तीकेंद्र, बूथ आणि मंडलनिहाय लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. काकास इंटरनॅशनल स्कूल, तापकीरनगर येथे आयोजित कार्यक्रमात जगताप सहभागी झाले.

Maharashtra : देशात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस, राज्यावरही दुष्काळाचे सावट

यावेळी चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सविताताई खुळे, ज्योतीताई भारती, माजी स्वीकृत नगरसेवक संदिप नखाते, पुणे नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, ॲड. मंगेश नढे, हर्षद नढे, सोमनाथ तापकीर, रमेश काळे, प्रकाश लोहार, भरत ठाकूर, कैलास सानप, विकास साठे, आकाश भारती, सचिन काळे, पंकज मिश्रा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित ( Chinchwad) होते.

तापकीरनगर येथे टिफीन बैठक

दरम्यान, काकास इंटरनॅशनल स्कुल, तापकीर नगर येथे प्रभाग क्रमांक 22 व 27 च्या वतीने ‘टिफिन बैठक’ पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये 110 हून अधिक लोक उपस्थित होते. सांगवी- काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर व बजरंग दल वकील आघाडीचे मंगेश नढे यांनी आयोजन केले. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी सकारात्मक भूमिकेतून काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune : पुण्यात आज पार पडणार जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांसी होणारा सुसंवाद म्हणजे “मन की बात”. आजच्या ‘मन की बात’मध्ये  मोदीजींनी ‘‘चांद्रयान-3’’ मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव केला. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशी कामगिरी करणाऱ्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांचा सन्मान केला. तसेच, सप्टेंबर महिन्यात राजधानी दिल्ली येथे  आयोजित करण्यात आलेल्या G – 20  साठी भारत देश संपूर्णपणे तयार असून तब्बल 40 देशांचे राष्ट्राध्यक्ष यामध्ये सहभागी होणार आहेत. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे असे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमातून कायमच समाजासाठी, शहरासाठी, आपल्या देशासाठी काम करण्याची आणखी ऊर्जा मिळाते, असे
शंकर जगताप ( Chinchwad) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.