Hadapsar : गणपतीची मूर्ती स्वस्तात दिली नाही म्हणून टोळक्याकडून मुर्ती विक्रेत्या कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज –  मूर्ती खरेदीसाठी गेलेल्या टोळक्याने मूर्तीच्या ( Hadapsar ) किंमतीवरून मूर्ती विक्रेत्या कुटुंबाला मारहाण केली आहे. ही घटना हडपसर येथील सानेगुरुजी शाळेसमोर रविवारी (दि.27) रात्री घडली.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रोहन शिवराम गुजर, विष्णू तिरुपती बिरसा व प्रसाद नारायण ( सर्व रा. भैरवनाला, फातिमानगर) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chinchwad : ‘मन की बात’मुळे समाजासाठी काम करण्याची प्रेरणा –  शंकर जगताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम देवराम राठोड, मजाराम ठोकामजी तावरी हे मूर्ती विकत होते. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या सोबत होते. आरोपी येथे मुर्ती खरेदीसाठी आले असता त्यांच्यात मूर्तीच्या किंमतीवरून वाद झाला.

या वादाचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी टोळक्याने रागात अल्पवयीन मुली महिला आणि मूर्ती विक्रेत्याच्या कुटुंबाला जबर मारहाण केली. मध्यरात्री झालेल्या अचानक हल्ल्यामुळे मूर्ती विक्रेते भयभीत झाले होते. पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून हडपसर पोलीस याचा पुढील तपास करत ( Hadapsar ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.