Chakan : भंगार विक्रेत्या सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

एमपीसी न्यूज – एका भंगार विक्रेत्या सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह चाकण येथून अटक केली. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुरूवारी (दि. 12) केली.

ऋषीकेश दिलीप कल्हाटकर (वय 23, रा. कल्हाकटर वस्ती, कोरेगाव बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना पालीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, एक व्यक्‍ती महेंद्रा कंपनी, निघोजे, चाकण येथे थांबली असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कल्हाटकर याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याचे विरूध्द विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगले प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमान्वये चाकण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ऋषीकेश कल्हाटकर हा चाकण पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याला सन 2018 मध्ये अशाच प्रकारे जवळ पिस्तोल बाळगल्याप्रकरणी चाकण पोलीसांनी दोन पिस्तोलसह अटक केली होती. आरोपी हा भंगार व्यवसायीक असुन त्याचा चाकण भागामध्ये भंगार खरेदी विक्रीचा व्यवयास आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, गणेश सावंत, प्रविण पाटील, विजय मोरे, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.