BNR-HDR-TOP-Mobile

Chakan: ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान न केल्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड येथे घडला.

मीरा बाळासाहेब रौंधळ, बाळासाहेब रौंधळ, स्वप्नील रौंधळ, महेंद्र रौंधळ (सर्व रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपाली सोमनाथ रौंधळ (वय 30 रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला मतदान का केले नाही ? त्यामुळे आमचा उमेदवार पडला असे म्हणत, त्याचा राग मनात धरुन मीरा यांनी दीपाली यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर, तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.