Chakan : बिग बजार मॉल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवणाऱ्या एकाला अटक 

एमपीसी न्यूज – तुम्हाला इथे मॉल चालवायचा असेल तर (Chakan)  मला एक हजार हप्ता द्यावा लागेल म्हणत धमकावणाऱ्या एकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना बुधवारी (दि.4) चाकण येथील बिग बजार मॉल येथे घडला आहे.

आकाश चंद्रकांत भोडके (वय 23 रा.चाकण) असे अटक आरोपीचे नाव असून यासीन युनूस मोहम्मद (वय 23 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PMRDA : नागरिकांना साडेनऊ कोटींच्या अनामत रकमेची प्रतीक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील बिग बजार मॉलयेथे आरोपी (Chakan) आला व त्याने तुम्ही मॉल कसा चालवता,मॉल बंद करा,मॉल चालवायचा असेल तर मला एक  रुपये हप्ता द्यावा लागेल असे धमकावले.

तसेच चाकूने मारण्याची धमकी देत पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.