BNR-HDR-TOP-Mobile

Chakan: विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा, भाम येथील घटना

461
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – सासरी नांदत असलेल्या विवाहितेचा छळ करून तिचे जगणे मुश्कील करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

कोमल प्रशांत बोंबले (वय-२५ वर्षे, रा. संतोषनगर, भाम, वाकी, ता. खेड) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती प्रशांत बापू बोंबले (रा. संतोषनगर, भाम, वाकी, ता. खेड) यांच्यासह बापू भिकाजी बोंबले, प्रतिक भिकाजी बोंबले (दोघेही रा. वेताळे, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष राजाराम बोरकर (वय – ४० रा. गोरेगाव, मुंबई) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, कोमल ही संतोषनगर (भाम) येथे सासरी नांदत असताना किरकोळ कारणावरून तिच्या सासरचे मंडळी तिला जाणूनबुजून त्रास देत होते. मुद्दाम खोचक बोलून आणि वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून तिचा छळ केला जात होता. दररोजच्या होत असलेल्या या जाचहाटाला वैतागून कोमल यांनी गुरुवारी (दि.२१ मार्च) सासरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोमल यांस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बोरकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.