HB_TOPHP_A_

Chakan : शाळेत जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

270

एमपीसी न्यूज – शाळेत जाऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तणूक करून तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी सव्वादोनच्या सुमारास काळूस गावच्या हद्दीत घडली.

HB_POST_INPOST_R_A

याप्रकरणी 66 वर्षीय वृद्धाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 25 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 15 वर्षीय नात शाळेत गेली असता दुपारी सव्वादोनच्या सुमारास आरोपी मुलीच्या शाळेत गेला. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलगी वर्गाबाहेर आली असता आरोपीने तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन केले. घाबरलेली मुलगी गुपचूप शाळेत जाऊन बसली. शाळा सुटल्यानंतर तिच्या मैत्रिणीसोबत घरी जात असताना आरोपीने पीडित मुलीला रस्त्यात अडवून दुपारी झालेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर मुलगी जास्त घाबरली. तिने ही बाब घरी सांगितली. त्यावरून तिच्या आजोबांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: