Chakan News : बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

एमपीसी न्यूज – तीन दिवसांपासून चाकण परिसरातून बेपत्ता असलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा चाकण जवळील वाकी हद्दीतील भामा नदीत (Chakan News )मृतदेह मिळून आला आहे. अंशू रमेश गिरी वय 18 ( रा. चाकण , मूळ रा. उत्तरप्रदेश ) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.

Makar Sankrant : यंदा मकर संक्रांत 14 ऐवजी 15 जानेवारीला का?

तो राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू विद्यालयाचा विद्यार्थी होता. अंशू गिरी बेपत्ता असल्याबाबतची तक्रार तीन दिवसांपूर्वी चाकण पोलिसांत देण्यात आली होती. बुधवारी (दि. 11) दुपारी भामा नदीत सदर विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.