Chakan News : ‘प्रहार जनशक्ती’च्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण, कोरोना योद्ध्यांचा गौरव

एमपीसीन्यूज : राज्याचे कामगार मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे खेड तालुका कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांच्यावतीने रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. या रुग्णवाहिकेची लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थित चाकण येथे करण्यात आले.

या वेळी तीस जणांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, नर्स, सफाई कामगार तसेच पीएमपी भोसरी बीआरटी प्रमुख काळुराम लांडगे व विजय आसादे यांचाही कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य पाहून सन्मानीत करण्यात आले.

श्रेया लॉन्स कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनंतराव काळे, जिल्हा संपर्क प्रमुख अजयमहाराज बारस्कर, जिल्हा संघटक निरज कडू, उद्योजक पप्पू जाधव, युवा नेते महेश जाधव, नाणेकरवाडीचे सरपंच साळवी, उद्योजक शरद नाणेककर आदी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग व सरकारी नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.