Pimpri Corona Update : शहरात आज 161 नवीन रुग्णांची नोंद, 37 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 59 हजार 154 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 472 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 305 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 167 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 46 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 441 आहेत. आज दिवसभरात 6 हजार 117 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 7 लाख 9 हजार 83 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.