Pune Crime News : तृतीयपंथीयाकडून भाजीविक्रेत्या महिलेला कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज – तृतीयपंथीयाने एका महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून मारहाण केली. त्या वेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजीविक्रेत्या महिलेचे कपडे फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उत्तमनगर परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी चाळीस वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे उत्तमनगर भाजी मंडई येथे भाजी विक्रीचे दुकान आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास एका तृतीयपंथी इसमाने भाजी विक्री दुकानासमोर बसलेल्या महिलेकडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय त्यांना मारहाणही केली. त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न तक्रारदार यांनी केला. याचा राग त्या तृतीयपंथीला आला. त्यामुळे तृतीयपंथीने मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 250 रुपये घेऊन पोबरा केला. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.