Chakan News : चाकण मध्ये कांद्याची आवक घटली ; दोन दिवसांपासून कांदा मार्केट मध्ये पडून

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील (Chakan News) महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी (दि. 1 एप्रिल ) कांद्याच्या आवकेत अचानक मोठी घसरण झाली. शनिवारी फक्त 10 हजार 500 पिशवी कांद्याची आवक होऊन कांद्याला 600 ते 900 रुपये एवढा भाव मिळाला. दोनच दिवसांपूर्वी चाकण मार्केट मध्ये तब्बल 1  लाख पिशवी ( 50हजार क्विंटल ) आवक झाली होती. त्या तुलनेत ही आवक नगण्य मानली जात आहे.

 

Manobodh by Priya Shende Part 87 : मनोबोध भाग 87– मुखी राम त्या काम बाधू शकेना

 

1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याला 200 क्विंटल कांद्यासाठी अनुदान देण्यात येणार असल्याचे धोरण शासनाने ठरवल्याने त्यापूर्वी कांदा मार्केट मधून आणून विक्री करण्यात आला.  खूप मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादकांनी 31 मार्च पूर्वीच कांद्याची मार्केट मध्ये विक्री केली. त्यामुळे कांद्याच्या आवकेत परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

 

दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर दोन दिवसांपूर्वी चाकण मार्केट मध्ये आलेला कांदा अद्यापही तसाच पडून आहे. मोठे खरेदीदार व्यापारी मार्केट कडे फिरकले नसल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांनी  1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत वाढ करून त्यानंतर देखील कांदा मार्केट मध्ये विक्री करणाऱ्या शेतकर्यांना अनुदान देण्याची मागणी केली (Chakan News) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.