Manobodh by Priya Shende Part 87 : मनोबोध भाग 87– मुखी राम त्या काम बाधू शकेना

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 87-Manobodh by Priya Shende Part 87

मुखी राम त्या काम बाधू शकेना

गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना

हरिभक्त तो शक्त कामास मारी

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी

 

 

ह्याच लोकात समर्थांनी रामनामाचे महत्त्वं पटवून दिले आहे, आणि त्यासाठी मारुतीरायांचं उदाहरण दिलंय.

पहिल्या चरणात ते म्हणताहेत की,”मुखी राम त्या काम बाधू शकेना”. मुखी राम म्हणजे ज्याच्या मुखात सतत रामनाम आहे.  नुसतं मुखात नाही तर चार वाणी पुढे जाऊन चित्तात रामनाम आहे.  त्या भक्ताला, साधकाला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे काम, कामवासना याची बाधा होऊ शकत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या माणसाच्या षड्रिपू मधील क्रोध, लोभ, मोह, मद,़ मत्सर यावर विजय मिळवता येतो.  ते पण अत्यंत कठीण आहे.

 

Pune News : पुण्याचा ऋतुराज गायकवाड झळकला पूर्ण भारतावर

 

 

पण प्रयासाने ते कमी करून त्यावर विजय मिळवता येतो. पण सगळ्यात बलशाली म्हणजे काम, यावर विजय मिळवता येत नाही.  तू काम सगळ्यात बलशाली आहे.  त्याचा त्रास सगळ्यांनाच असतो.  त्याचे बाधा सर्वांनाच होते.  पण अशा बलशाली कामावर पण विजय मिळवता येतो, जर आपल्या मुखात अंतकरणात चित्तात जर सतत रामनाम असेल. नुसता मुखात असून चालत नाही तर तो चित्तांत असला पाहिजे.  आतून त्याचा भाव यायला पाहिजे. म्हणजे कामा सारख्या बलाढ्य शत्रूवर पण विजय मिळवू शकतो ते (Manobodh by Priya Shende Part 87) केवळ राम नामाने.

अन्न खाताना त्यात मीठ जास्त झालं तर खाण्यायोग्यं राहत नाही.  तसाच काम पण आवश्यकतेनुसार असावा. पण तू जास्त झाला तर बाधतो.  अन्न जसं आवश्यकतेनुसार खावं त्यापेक्षा जास्त झालं तर ते पाहत होतं तसंच कामाचा आहे. तो आवश्यकतेपेक्षा जास्त झाला तर बाधतो. त्यावर उपाय म्हणजे रामनाम आहे.  त्याने कामाची बाधा होत नाही.

पुढे ते म्हणताहेत की,”गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना”.  काम कमी करायचा असेल तर इंद्रियांना ताब्यात ठेवायला लागतं आणि ते ताब्यात ठेवण्यासाठी अंगी जिद्द आणि धारिष्ट दोन्ही आवश्यक आहे.  आपल्याला एखादी गोष्ट करायची नाहीये असं म्हणलं की हटकून ती गोष्ट करावीशी वाटते. तर त्यासाठी इंद्रियांना ताब्यात ठेवायला सुद्धा अंगात धरिष्ट असावा लागतो.  आपल्याला एखाद्या चुकीच्या गोष्टीला सुद्धा करायचं नाहीये. हे नाही म्हणायला, धारिष्ट लागतं. संयम लागतो.  तर असं हे धारिष्ट नाम नामामुळे येतो.

पुढे ते म्हणताहेत की,”हरिभक्त तो शक्त कामास मारी”.हा इतका चिवट षड्रिपू काम हा फक्त रामनामामुळे आटोक्यात येतो.   जो हरिभक्त आहे.  ज्याच्या मुखात आणि अंत:करणात सतत रामनाम आहे तोच केवळ कामावर विजय मिळवू शकतो. म्हणजे आवश्यकतेनुसार तो कामाला महत्त्व देतो आणि कामावर विजय मिळवतो.

 

तर असे हे गुण असलेला सदैव श्रीरामांच्या आज्ञेचे पालन करणारा, त्यांची सेवा करणारा, प्रभूचे चिंतन करणारा, षड्रिपूंवर मात करणारा, सदैव मुखात आणि अंतःकरणात राम वसवणारा, सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवणारा, रामाचा दास हनुमंत, हा ब्रह्मचारी.  म्हणजे अखंड ब्रम्हांत वास करणारा, म्हणजेच ब्रह्माशी एकरुप झालेला.. त्याच चिंतनात असतो, तो ब्रह्मचारी.  रामाच्या चरणांशी असलेला रामाचा दास, भक्तं हा जगात धन्य होतो. “जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी”, असं शेवटच्या चरणात समर्थ सांगताहेत.

 

ज्याच्या मुखात राम असतो त्याला काम वासनेचा विकार जडत नाही. जो हरिची भक्ती करतो, तो काम वासनेला मारतो.  म्हणून समर्थ सांगताहेत की मुखात राम असू दे म्हणजे मोठ्यातला मोठा शत्रू काम वासना हा तुमच्या काबूत राहील.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.