Chakan : चाकणजवळ एक नव्हे चक्क तीन बिबटे; नागरिकांमध्ये दहशत

एमपीसी न्यूज : चाकण शहराच्या जवळील काळूस (Chakan) येथील जाचक वस्तीवर एक नव्हे तर चक्क तीन बिबटे आढळल्यामुळे काळूस सह चाकण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच वेळी एवढे बिबटे आढळून येत असल्याने पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडणारे जीव मुठीत धरून जात असून अनेकांनी तर सकाळी फिरणेच बंद केले आहे.

काळूस येथील जाचक वस्तीवर तीन बिबट्यांचा वावर असल्याचा व्हिडिओ समोर आला झाला आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली आहे. खूप मोठे क्षेत्र असल्याने येथे अद्याप पिंजरा लावण्यात आलेला नाही. बिबट्याच्या भीतीने काळूस मध्ये रात्री पासून रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत होता. वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यासारख्या पुरेशा उपाययोजना जनजागृती करण्यात येत नसल्याची काळूस मधील स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
बिबट्या आणि खेड तालुका हे जणू समीकरणच झाले आहे.

Pune : खडकवासला धराणाच्या पाणलोट क्षेत्रात 20 किमीपर्यंत पर्यटकांना घालणार बंदी

आठवडा उलटत नाही तर खेड तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आणि चक्क शहरालगत असणाऱ्या भागात बिबट्याचे दर्शन होते. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी बिबट्या फक्त दर्शंनच देत नाही तर हल्ला देखील करतो. हल्ल्याच्या घटना ही अनेक घडल्या आहेत. मागील काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात भिवेगाव, धुवोली भागात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण परिसरात प्रथमच एवढे बिबटे एकत्रित पणे दिसून आल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.

 

बिबट्यांची अभयारण्यात राहण्यास नापसंती !

खेड तालुक्यात विविध गावात विशेषतः शेतवस्तीच्या भागात सहज (Chakan) खायला मिळत असल्याने बिबट्याने भीमाशंकर अभयारण्यात राहण्यास नापसंती दर्शविल्याचे स्पष्ट होत आहे. बिबट्या आता अभयारण्याबाहेरच अधिक वावरत असून, हक्काचे घर असलेल्या अभयारण्यात त्याचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही.

ऊस हेच त्याचे घर बनले असून, गावाशेजारील कुत्री, वासरू, शेळी, मेंढी, डुक्करे हे भक्ष्य त्याला सहज मिळत आहे. परिणामी तो अभयारण्यापासून दूर जात आहे. भीमाशंकर अभयारण्य हे बिबट्यांचा अधिवास होता. पण आता तिथेच बिबट्या दिसून येत नाही. यंदाच्या बौद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत एकही बिबट्या अभयारण्यात दिसला नाही. इतर सांबर, शेकरू, चितळ मात्र दिसले. वन विभागाच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यात ५ मे रोजी बौद्धपोर्णिमेनिमित्त प्राणी गणना करण्यात आली. यंदा अभयारण्यातील आठ पाणवठ्यांवर वनकर्मचारी व वन्यजीव प्रेमी बसविले होते. हे सलग दुसरे वर्ष असून बिबट्याचे अभयारण्य भागात दर्शन झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.