Pune : खडकवासला धराणाच्या पाणलोट क्षेत्रात 20 किमीपर्यंत पर्यटकांना घालणार बंदी

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणाचे पाणलोट (Pune) क्षेत्र हे पुण्याचे जवळचे एक पर्यटन क्षेत्र बनत चालले आहे. मात्र पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरल्याने अनेक पर्यटकांना आपला जिव गमवावा लागला आहे. काल (सोमवारी) अशाच प्रकार दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या पाणलोट क्षेत्रात धरणाच्या मागील बाजूच्या 20 किलोमीटर पर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यासाठीजल संपदा विभाग पावले उचलत आहे. लवकरच त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सोमवारी नऊ मुली पाण्यात उतरल्या होत्या सुदैवाने त्य़ातील सात मुलीचे जीव वाचले मात्र दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला. विशेषता स्थानिक नमागरिक ही पर्यटकांना याची कल्पना देतात मात्र पर्यटक उत्सहाच्या भरात पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरतात व अशा दुर्घटना होतात.यालाच प्रतीबंध म्हणून प्रशासन काही निर्भंध घालण्याचा विचार करत आहे. यात पाणलोट क्षेत्रात 20 किमीपर्यंत बंदी, तसे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार. यासोबतच धरणात उतरल्यास आत्ताही 500 रुपये दंड आकारला जातो.

Chinchwad : महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये; फडणवीसांकडून संकेत

धरणाजवळ चौपाटी असलेल्या भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या सहाय्याने नुकत्याच जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच धोकादायक आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच दररोज 10 सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने पर्यटक धरणाच्या मागील बाजूने जात पाण्यात उतरत आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडत असल्याने धरणाच्या मागील (Pune) बाजूने पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.