Pune : यंदा पुणेकरांना पाणी टंचाईचे संकट, पाटबंधारे चे महापालिकेला पाणी बचतीसाठी पत्र

एमपीसी न्यूज – खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा (Pune)कमी होत असून, उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज 1510 एमएलडी पाणी घेत आहे. अशाच पद्धतीने पाणी वापर केल्यास जून-जुलै महिन्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.

त्यामुळे महापालिकेने दैनंदिन पाणी वापर 1250 ते 1300 एमएलडीपर्यंतच करावा. ग्रामीण भागासाठी 2.5 टीएमसी पाणी बचत करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने दिली आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराला खडकवासला आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून (Pune)पाणी पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाने शहरासाठी 12.60 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने शेतीची स्थिती चिंताजनक आहे, ग्रामीण भागातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत तर विहिरी, बोअरलाही कमी पाणी आहे. त्याचा परिणाम थेट पिकांवर होत आहे.

Pune : लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने 1600 पेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती

पुणे शहराची झालेली हद्दवाढ, वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. रोज 1650 एमएलडी पाणी वापर होत असला तरी टेलएंडच्या भागात पूर्ण क्षमेतेने पाणी पुरवठा होऊ शकत नाही. जर महापालिकेने 1250 ते 1300 एमएलडी पाणी वापर म्हणजे दैनंदिन पाणी वापर 350 ते 400 एमएलडीने कमी केल्यास अनेक भागांत तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट अन दुसरीकडे पाणी वितरणातील त्रुटी व मर्यादेमुळे पाणी कपात करणे महापालिकेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

पाठबंधारे च्या महापालिकेला सूचना –

पुण्यासाठी रोज पाणी वापर – 1650 एमएलडी, ‘खडकवासला’तून घेतले जाते पाणी – 1510 एमएलडी, भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा -140 एमएलडी दोन्ही प्रकल्पातून पाणी वापर कमी होणे आवश्‍यक, उन्हाळी आवर्तन आणि जून-जुलैमध्ये पुरसे पाणी उपलब्ध होण्यासाठी 2.5 टीएमसी पाण्याची बचत आवश्‍यक, महापालिकेने 5 डिसेंबरपासूनच पाणी बचत करण्याची पाटबंधारे ची सूचना,अन्यथा उन्हाळी हंगामात ग्रामीण भागात पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी टंचाईची शक्यता

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.