Pune : अजित पवार माझाही प्रचार करणार : विजय शिवतारे

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Pune)पुरंदरला माझ्याही प्रचाराला येणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे म्हणाले.

अजित पवार महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली (Pune)असल्याचेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले. राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी घडत असतात. मात्र, कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो.

अजित पवार कुटुंबावर २०१९ च्या निवडणुकीत केलेल्या वादग्रस्त टीकेवरुन विधानसभेला विजय शिवातारेंचा पराभव करण्याचा चंग अजित पवारांनी बांधला होता. त्यानंतर शिवतारे यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार म्हणून संजय जगताप निवडून आले.

Pimpri : युरोपियन देशात उच्च शिक्षणाची संधी; पीसीईटी व एज्युकेरॉन इंटरनॅशनल मध्ये शैक्षणिक करार

अजित पवार यांच्यावर टीका करणे ही आपली चूक होती, अशी जाहीर कबुली शिवतारेंनी दिली होती. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा निवडणुकीला उभा असतो तेव्हा काही मर्यादा पाळायच्या असतात. त्या मी पाळल्या नाहीत, असेही कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवतारे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार आहे. अजित पवार आणि आमदार बाहेर पडल्याने राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय जगताप यांच्यासाठी प्रचार केला होता.

2024 च्या निवडणुकीची विजय शिवतारे यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना प्रचारासाठी आगामी काळात आणणार असल्याची भावना बोलून दाखवली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.