Cricket : वेंगसरकर अकॅडमी आणि आर्यन्स अकॅडमी यांची विजयी घोडदौड सुरूच

एमपीसी न्यूज – U19 वुमेन्स व्हेरॉक कप 2023 स्पर्धेतील(Cricket) साखळी सामन्यांमध्ये व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आणि आर्यन्स क्रिकेट अकॅडमी या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून आज झालेल्या सामन्यांमध्ये नव्या दुबे आणि आर्या उमाप या खेळाडू सामनावीरांगना ठरल्या आहेत.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध स्कोअर स्पोर्ट्स अचिव्हर यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात स्पोर्ट्स अचिव्हरने प्रथम फलंदाजी करताना केवळ 70 धावाच केल्या.

Pimpri : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस कडून महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड

त्यांच्या 9 खेळाडूंना दोन अंकी संख्याही गाठता (Cricket)आली नाही. वेरॉकच्या संघाने 10 व्या षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले. या सामन्यात वेरॉकची नव्या दुबे ही सामना वीरांगना ठरली. तिने 5 षटकांत 4 धावा देत 5 विकेट मिळवले. अचल अगरवाल 3 बळी तर निकिता सिंह हिने 2 विकेट घेतले.

आर्यन्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी यांच्यात झालेल्या सामन्यात आर्यन्स च्या संघाने 7 विकेट राखून विजय प्राप्त केला.

ऑल स्टार्सने दिलेले 122 धावांचे आव्हान दिले. आर्यन्सने 7 विकेट आणि 3 षटक राखून हे आव्हान सहज गाठले. या सामन्यात आर्या उमप सामनावीरांगना ठरली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.