Pimpri : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस कडून महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pimpri )वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

त्यानुसार मंगळवारी सांगवी येथील बा. रा. घोलप महाविद्यालयात वृक्ष लागवड करून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. तसेच ताथवडे येथील नरसिंह महाविद्याल व काळेवाडी येथील खिंवसरा विद्यालयात विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.

Maharashtra : शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे (Pimpri )यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सांगवी येथील बा. रा. घोलप महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी चैतन्य बनकर व संकेत वाघमारे यांच्या माध्यमातून वृक्षांची लागवड करण्यात आली.

बालाजी जाधव, अक्षय शेडगे, जगदीश गपट या पदाधिकाऱ्यांनी ताथवडे येथे नरसिंह महाविद्यालय व काळेवाडी येथील खिंवसरा विद्यालय येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप केले. हर्षद परमार यांच्या वतीने काळेवाडी येथील सौ. लक्ष्मीबाई तापकीर विद्यालातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. या विद्यालयात प्राचार्य, विद्यार्थी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.