Rohit sharma : विश्वचषकानंतरचा काळ कठीण होता; कुटुंबीय, मित्रमंडळी व चाहत्यांचे प्रेमातून प्रेरणा; रोहित शर्माने विश्वचषकानंतर पहिलीच प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार आणि (Rohit sharma)धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने विश्वचषकातील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकात सलग 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवासोबतच भारताला विश्वचषक गमवावा लागला. त्यानंतर 20 दिवसांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने समाजमध्यमाद्वारे संवाद साधला आहे.

Pune : पुण्यातील कचरा वेचकांचाही शहरी कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये समावेश करण्यात यावा : सुनील कांबळे

विश्वचषकानंतरचा काळ कसा होता

रोहित म्हणाला, विश्वचषकातील पराभवानंतर सुरुवातीचे (Rohit sharma)काही दिवस या परिस्थितीशी कसे तोंड द्यावे हेच कळत नव्हते. त्या घटनेमुळे माझ्यासह सर्वजन खूप निराश होते, पण माझे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकारी यांच्या पाठींब्यामुळे त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकत आणि पराभव पचवण्याची क्षमता माझ्यात आली. कोणतेही गोष्ट कायम नसते, जसाजसा वेळ पुढे जातो तसे आपल्याला तो पराभव विसरून पुढे जावे लागते, आपल्याला जास्त वेळ पराभवाला कवटाळून बसता येत नाही. त्यातून लवकर सावरणे हे माझ्यासाठी आणि संघासाठी महत्वाचे होते. मात्र या दुःखातून बाहेर पडणे सोपे नव्हते.

विश्वचषकाचे जिंकण्याचे स्वप्न

माझ्यासह प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न असते की, देशासाठी विश्वचषक जिंकावे. माझ्यासाठी वनडे विश्वचषक हे फार महत्वपूर्ण आणि अमुल्य बक्षीस आहे. त्यासाठी तुम्ही इतके वर्ष सर्व पणाला लाऊन मेहनत करता, त्या ध्येयासाठी स्वत:ला वाहून घेता, त्यानंतर मात्र तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर तुम्ही निराश नक्कीच होता किंबहुना अतिनिराश होता. मात्र तुम्हाला सगळे विसरून त्यातून बाहेर पडावे लागते.

विश्वचषक स्पर्धा कशी राहिली

रोहित म्हणाला, आम्ही आमच्या बाजूने उत्तम खेळ केला, आम्हाला कोणी विचारल की तुम्हच्या काय चुका झाल्या ? तर मी म्हणेन की आम्ही जे 10 सामने जिंकले त्यामध्येही आमच्याकडून चुका झाल्या, चुका झाल्याच नाहीत असे नाही. किंबहुना कोणताही खेळ परिपूर्ण नसतो, मात्र आम्ही खेळ परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या संघाने खूप चांगला खेळ केला. त्याचा मला अभिमान आहे, कारण असा खेळ प्रत्यक विश्वचषकात कोणताही संघ करत नाही. आमच्या संघाने खूप चांगला खेळ केला. लोकांना भारतीय संघाच्या कामगिरीचा अभिमान वाटायचा. त्यांनी आमचा खेळ खूप एंजॉय केला.

लोकांची प्रतिक्रिया काय होती

पराभवानंतरचा काळ खूप कठीण होता. पराभवाचे शल्य मनातून जात नव्हते, अस वाटत होतं की, कुठेतरी शांत ठिकाणी जावे, सर्व गोष्टी विसरून डोक शांत करण्यासाठी ते फार महत्वाचे होते. मात्र कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या सहवासाने लवकर त्यातून बाहेर पडण्यास मदत झाली. जिथे गेलो तिथे क्रिकेटप्रेमींनी माझ्यासह सर्व संघाचं कौतुक केलं. प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल, चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. पराभवाचे मरगळ घालवण्यासाठी ते फार प्रभावी ठरते. कारण लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ऐकून बरे वाटते. तसेच लोकांना हे माहित आहे की, खेळाडू कोणत्या परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे सर्वांचे आमच्याप्रती असलेले प्रेम त्यांच्या वर्तनातून जाणवते.

दीड महिना लोकांनी आम्हाला जे प्रेम दिले ते वाखण्याजोगे होते. प्रत्येकाला आम्ही तो विश्वचषक उंचवावा अशी अपेक्षा होती. त्यामुळे सामना खेळण्यासाठी कोणत्याही शहरात गेलो तेथे लोकांनी फार चांगले स्वागत केले, खेळाच कौतुक केलं. त्यांच्या क्रिकेट प्रेमाला मी दाद देऊ इच्छितो. मात्र अंतिम सामन्यात हरलात हे दुःख अजूनही राहते. पण लोकांचे प्रेम आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहून परत क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा मिळते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.