Rohit Sharma : एक्सप्रेस वेवरून भरधाव कार चालवणे भारताच्या कर्णधाराला पडले महागात; महामार्ग पोलिसांनी केली कारवाई

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  याला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून आपली आलिशान कार भरधाव चालवणे महागात पडले आहे. ओव्हर स्पीडची कारवाई करत महामार्ग पोलिसांनी तीन चलान कापले आहेत.

गुरुवारी (दि. 19) गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट संघ बुधवारी पुण्यात दाखल झाला आहे. बुधवारी दुपारी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  आपल्या आलिशान कारने मुंबईहून पुण्याला येण्यासाठी निघाला.

Pune : चाकण एमआयडीसीमधील वीजप्रश्न प्राधान्याने सोडविणार – प्रादेशिक संचालक अंकुश नाळे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने येत असताना गुळगुळीत रस्त्याने कार वेगात चालवण्याचा मोह कर्णधार रोहितला आवरला नाही. द्रुतगती मार्गावर वाहन चालवण्याची मर्यादा 80 किलोमीटर प्रती तास एवढी आहे.

असे असताना रोहितने तब्बल 200 किलोमीटर प्रती तास एवढ्या वेगाने आपली कार चालवली. तो यापुढे जाऊन 215 च्या स्पीडवर देखील पोहोचला असल्याचे महामार्ग पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

यामुळे द्रुतगती मार्गावर तीन ठिकाणी त्याच्यावर ओव्हर ओव्हर स्पीडिंगची कारवाई झाली आहे. दरम्यान, भारताच्या कर्णधाराने असे एकट्याने फिरणे योग्य नाही.

त्याने संघासोबत फिरणे योग्य आहे. तसेच त्याने पोलीस संरक्षणात ये-जा केली पाहिजे, अशा प्रकारच्या पोस्ट सोहल मिडीयावर व्हायरल होऊ लागल्या (Rohit Sharma)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.