BJP : फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभेच्या संयोजकपदी रवींद्र प्रभुणे, नंदू भोगले यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या ( BJP ) वतीने फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये संयोजक, सहसंयोजक तसेच 48 लोकसभा संयोजक यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यात मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा संयोजक पदी नंदू भोगले यांची तसेच चिंचवड विधानसभा संयोजकपदी रवींद्र  प्रभुणे यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय महिला आघाडीच्या प्रवक्त्या उषा वाजपेयी, मावळ लोकसभा संयोजक प्रमोद देशक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते ही नियुक्ती पत्रे देण्याचा कार्यक्रम पिंपळे गुरव येथील कार्यालयात कार्यक्रम पार पडला.

2014 नंतर देशात असा मोठा जनसमुदाय तयार झाला. ज्यांना कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मात्र भाजपची विचारधारा कार्यपद्धती व विकास निती आवडते, अशा लोकांशी संपर्क ठेवणे आगामी काळात फायद्याचे ( BJP ) राहील.

चालू घडामोडी एखादी घटना किंवा जनहितकारी योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा असा जनसमुदाय अग्रेसर राहू शकतो, अशा समुदायाला जोडून घेण्यासाठी “फ्रेंड्स ऑफ बीजेपी” हे अभियान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केले आहे, असे मत मावळ लोकसभाचे संयोजक प्रमोद देशक यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांच्यासह संघटनेतील पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित ( BJP ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.