Hadapasar : हडपसरमध्ये पुन्हा गुंडागर्दी; बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा गुंडांनी गोंधळ घातल्याचा प्रकार (Hadapasar) उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वर्गीय अण्णासाहेब मगर उपबाजार आवारात एका व्यापाऱ्याला चार जणांनी धक्काबुक्की करत त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून नेली. सोमवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान हा प्रकार घडला.

विजय नारायण घुले (वय 53) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी चार अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्यापारी भरत मकासरे यांना गुंडांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

Chakan : चाकणजवळ एक नव्हे चक्क तीन बिबटे; नागरिकांमध्ये दहशत

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भरत मकासरे यांनी स्वर्गीय अण्णासाहेब मगर उपबाजार आवर आपण शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी केली होती. खरेदी केलेला हा माल टेम्पोमध्ये भरत असताना आरोपींनी टेम्पोत भरलेले शेतमालाचे कॅरेट जबरदस्तीने (Hadapasar) बाहेर काढले. हे कॅरेट घेऊन जात असताना भरत मकासरे यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातील बाराशे रुपये रोख जबरदस्तीने काढून दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.