Pune : नवलाख ऊंब्रे येथील कंपनीच्या परिसरात रानमांजराची सुटका

एमपीसी न्यूज – नवलाख उंब्रे येथील एका कंपनीच्या (Pune) आवारातून एका जखमी रानमांजराची काल (सोमवारी) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने सुटका करण्यात आली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य साहिल नायर, साहिल लांडगे, विकी दौंडकर यांनी रानमांजरला सुरक्षितपणे रेस्क्यू केले.

त्याची माहिती त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल अंद्रे यांना दिली. गणेश निसाळ, गणेश ढोरे, जिगर सोलंकी यांनी प्राथमिक तपासणी करून वडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना माहिती दिली.

Hadapasar : हडपसरमध्ये पुन्हा गुंडागर्दी; बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्याला मारहाण

नवलाख उंब्रेमध्ये एका कंपनीच्या आवारात रानमांजर आहे, असा फोन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना आला. माहिती मिळताच तत्काळ त्या रानमांजराला पुढील उपचारासाठी (Pune) पुणे इथे पाठवण्यात आले. यावेळी नागरिकांना
कोणतेही जखमी वन्यप्राणी आढळल्यास वनविभाग (1926) व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला (9822555004) जवळपास असणारे प्राणीमित्र यांना कळवा, असे आवाहन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.