PCMC : छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त महापालिका व सामाजीक संस्थाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) व आपला परिवार सोशल फाउंडेशन आणि इतर 26 सामाजिक संस्थांनी रविवारी (दि.14) छत्रपती संभाजी महारााज जयंती निमीत्त स्वच्छता अभियान 2023. शहरात राबविले. हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक सदन, एमआयडीसी भोसरी येथे पार पडला. या अभियानात समविचारी समाजाप्रती, पर्यावरणाप्रती असलेली तळमळ असणाऱ्या एकूण शहरातील 27 संस्थांतील 450 पेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी दोन कि.मी.परिसर कचरा, प्लास्टिक उचलून साफ सफाई करत स्वच्छ केला.

आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत स्वच्छता अभियान “सहभाग गौरव पत्र” व गुलाब पुष्प क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे ,भारत स्वच्छ अभियान समन्वयक सोनम देशमुख आणि आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते सहभागी संस्थांना देवून गौरविण्यात आले. सर्व उपस्थिती सदस्यांनी दरम्यानच्या काळात स्वच्छता व पर्यावरणाची शपथ घेतली.

क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की, मातृदिनाचे औचित्य साधून मातृतुल्य अशा वसुंधरेची काळजी आपण सर्वानी घेतली पाहीजे. रस्त्यावर थुंकने अर्थात लाल पिचकारी मारुन रंग रंगोटी करु नये. प्लास्टिक कचरा निर्मुलन स्वच्छतेची असणारी प्रत्येकाची जबाबदारी आणि आपल्या (PCMC) संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव त्यानी केला.

आपल्या शहरासाठी,राज्यासाठी,देशासाठी एकत्र येऊन पर्यावरण, वसुंधरेसाठी काम करण्याचा विचार सर्व संस्थांच्या सदस्य, अध्यक्षांनी मांडला . अभियान ठिकाणी असलेल्या दगडांवर वैशिष्ट्यपुर्ण रंग रंगोटी करुन आकर्षक शुशोभिकरन करण्याचा प्रयत्न काही संस्थांनी केला.

Hadapasar : हडपसरमध्ये पुन्हा गुंडागर्दी; बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्याला मारहाण

यावेळी घर घर नारा, स्वच्छ देश हमारा…आमचे शहर, स्वच्छ शहर,हरित शहर,आपली जबाबदारी…प्लास्टिक मुक्त भारत देश हमारा…या घोषणा देण्यात आल्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपला परिवाच्या अध्यक्ष एस आर शिंदे आणि स्वच्छता कमिटी अभयशेठ गादिया, नवनाथ नलावडे, सचिन गावडे,पराग खाडिलकर,राजू खांदवे, रुपेश गुंड, राजेश देशमुख आणि शहाजी जगदाळे महेश बारसावडे प्रवीण कुरबेट यांनी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचे आभार कमिटी मेंबर नवनाथ नलावडे यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.