Chakan : चाकण शहरात पोलिसांचे संचलन

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण मध्ये पोलिसांनी ( Chakan ) शुक्रवारी (दि. 22 ) सायंकाळी भरपावसात रुट मार्च काढून शहरात संचलन केले. चाकण शहरातील नागरिकांना जाणीव व्हावी की,पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत, तसेच समाजकंटकांना ही जरब बसावी, गणेशोत्सव काळात शहरात शांतता असावी यासाठी रूट मार्च काढून पोलिसांनी संचलन केले.
पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे व चाकणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी या रुट मार्च मध्ये सामील झाले ( Chakan ) होते.