Pune : हे गणराया…. भाजप नेत्यांना सुबुद्धी दे – सुप्रिया सुळे 

एमपीसी न्यूज – आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस ( Pune) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरती देखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य देखील केले.
वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की,देशात महागाई वाढली.महिलांवर अत्याचाराच्या घटना ( Pune) वाढल्या, तरुणांना रोजगार नाही, या सर्व बाबीवर उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्याच दरम्यान काल महिला आरक्षणाच विधेयक संसदेत मंजूर होत होते त्यावेळी खासदार कनीमोळी याच्यावर एका भाजपच्या खासदाराने अपशब्द वापरले आहे, ही बाब निषेधार्थ आहे.

एका बाजूला महिला आरक्षणाच विधेयक मंजूर होत आहे.तर दुसर्‍या बाजूला महिला खासदाराचा अपमान करण्याच पाप भाजप नेत्याने केले आहे.यातून भाजपची मानसिकता दिसून येत आहे.त्यामुळे गणराया भाजप नेत्यांना सुबुद्धी देवो ,अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
तसेच त्या  म्हणाल्या की, देशात आणि राज्यात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाला आहे.त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळी राजाला न्याय मिळू दे, हीच गणरायाकडे प्रार्थना करीत असल्याचे ( Pune) त्यांनी सांगितले.\

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.