Chakan : कंपन्यांतील वीज वापर आणि इलेक्ट्रिकल सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर (Chakan) विभाग महाराष्ट्र शासन व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी तसेच औद्योगिक इलेक्ट्रिकल सुरक्षिततेसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

राज्य शासनाचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर एन जी सूर्यवंशी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे संचालक मनोज बंसल, सचिव दिलीप बटवाल, स्वीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ईशान शहाडे, इलेक्ट्रिकल विभागाचे व इतर विभागाचे एकूण 100 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात एन जी सूर्यवंशी यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने इलेक्ट्रिकल सेफ्टी ठेवण्यासाठी इलेक्ट्रिकल उपकरने कशी हाताळावीत, इलेक्ट्रिकल अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याविषयी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल अपघात होऊ नयेत म्हणून काय पूर्वतयारी करावी, काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली.

BJP : भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान; शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती

मनोज बंसल यांनी इलेक्ट्रिसिटी बिल कसे वाचावे. इलेक्ट्रिसिटी बिल कसे कमी करावे. ज्यामुळे वैयक्तिक फायद्याबरोबर देशाचे हितही कसे साधावे याविषयी माहिती दिली. ईशान शहाडे यांनी इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्यासाठी (Chakan) व इलेक्ट्रिसिटीचा इफेक्टिव वापर करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी वाया जाऊ नये म्हणून व त्याच बरोबर सोलर पावर या विषयावर सखोल माहिती दिली. उपस्थित सदस्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.