Chakan : प्रवासी वाहतुकीच्या बसवरून दुचाकींची वाहतूक

एमपीसी न्यूज- सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी (Chakan) समजल्या जाणाऱ्या शासकीय आणि खाजगी बसेसचा प्रवास खडतर स्थितीत सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेस वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक अवस्थेत  प्रवास करत आहेत. राजस्थान येथून कोल्हापूर कडे निघालेल्या बस चालकाने चक्क अनेक दुचाकी गाड्या बसच्या टपावर ठेवून धोकादायक स्थितीत वाहतूक करत असल्याचे  पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर  चाकण मधील तळेगाव चौकात समोर आले.

येथील तळेगाव चौकातील वाहतूक पोलिसांनी अपेक्षेप्रमाणे या चालकास पोलीस चौकीत बराच वेळ बसवून ठेवल्याने ही बस रस्त्यातच उभी करण्यात आली होती. भिलवाडा ( राजस्थान ) ते कोल्हापूर असा प्रवास करणारे बस मधील प्रवासी बराच वेळ येथे ताटकळत उभे होते. दरम्यान कुठल्या तडजोडी नंतर ही (Chakan) बस सोडण्यात आली हे मात्र समजू शकले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.