Kishore Aware : वडिलांना कानशिलात दिल्याने मुलाने दिली सुपारी; किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपींकडून धक्कादायक खुलासे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मोठे प्रस्थ असलेल्या व्यक्तीच्या कानशिलात दिली. त्या रागातून त्या व्यक्तीच्या मुलाने किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यात हे धक्कादायक (Kishore Aware) खुलासे समोर येत आहेत.

त्यानंतर पोलिसांनी कथित सुपारी दिलेल्या गौरव चंद्रभान खळदे (रा. तळेगाव) याला अटक केली आहे. माजी नगरसेवक चंद्रभान खळदे आणि किशोर आवारे यांचा जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी चंद्रभान खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मुलगा गौरव याच्या मनात होता. त्यातूनच त्याने इतर आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली, असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी पोलिसांनी श्याम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 32, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) यांना अटक केली आहे.

Chakan : प्रवासी वाहतुकीच्या बसवरून दुचाकींची वाहतूक

आरोपींना शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

वडिलांच्या कानशिलात लगावल्याने गौरव याने सुपारी दिली. हत्या केल्यानंतर आरोपी कर्जत येथे एका फार्म हाउसवर जाणार होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी फार्म हाउस पाहून ठेवले होते. किशोर आवारे यांची हत्या केल्यानंतर नगरपरिषद कार्यालायासामोरून कार मधून आरोपी पळून जाणार होते.

मात्र गोळीबाराचा आवाज झाला आणि त्यावेळी नगरपरिषद कार्यालयासमोर लोकांची मोठी गर्दी जमा होऊ लागली. त्यामुळे आरोपींनी कार मधून पळून न जाता काही अंतर पायी पळून गेले आणि तिथून दुचाकी हिसकावून पळाले असल्याचेही चौकशीत समोर आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मात्र मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुपारी प्रकरणासह अन्य सर्व शक्यता पोलीस तपासून पाहत (Kishore Aware)आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.