Chakan : मांजर मारल्याच्या रागातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – मांजर गाडीखाली घेऊन मारल्याच्या रागातून तीन जणांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच तरुणाची मोटार फोडली. ही घटना सोमवारी (दि. 15) खराबवाडी येथे राजनंदिनी हॉटेल समोर घडली.

योगेश सुनील पडवळ (वय 24, रा. म्हाळुंगे पडवळ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची मांजर योगेश यांच्या गाडीखाली आली. त्यात ती जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. याच्या रागातून योगेश यांना अडवून तिघांनी मिळून मांजर मारल्याचा जाब विचारत लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये योगेश यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच योगेश यांच्या मोटारीची काच फोडून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.