BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : दरवाजा न उघडल्याने चौघांकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा वाजवला. तरुणाने दरवाजा उघडला नाही. उलट दरवाजा वाजवल्याचा जाब विचारला. या रागातून चार जणांनी मिळून तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठच्या सुमारास आयआयबीएम कॉलेज, चिखली येथे घडली.

मनीषकुमार बीजंदरसिंग कुसवा (वय 19, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील याने कुसवा यांच्या घराचा दरवाजा दोन ते तीन वेळा वाजवला. मात्र कुसवा यांनी दरवाजा उघडला नाही. कुसवा यांनी सुनील यांच्याकडे दरवाजा का वाजवला अशी विचारणा केली. यावरून चिढलेल्या चार जणांनी मिळून कुसवा आणि त्यांचे मेहुणे राजेश कुसवा यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3