Weather Report : पुणे व मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता 

Chance of moderate rainfall in Pune and Mumbai.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार  पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहू्न मध्यम तर  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासहित अतिवृष्टी झाली. कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा: वाल्पोई 16, कणकवली, पोलादपूर, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी 12 प्रत्येकी, भिरा, वैभववाडी 11 प्रत्येकी, कानकोना, दोडामार्ग, लांजा, महाड 9 प्रत्येकी, चिपळूण, केपे, राजापूर 8 प्रत्येकी, खेड, कुडाळ, पणजी (गोवा) 7 प्रत्येकी, मालवण , मंडणगड, म्हापसा, रत्नागिरी, वेंगुर्ला 6 प्रत्येकी, खालापूर, माणगांव, मडगाव, माथेरान, मोखेडा, पेडणे, रामेश्वर कृषी, श्रीवर्धन 5 प्रत्येकी, गुहागर, जव्हार, कर्जत, म्हसळा, सुधागड पाली 4 प्रत्येकी , देवगड, हर्णे तलासरी , उल्हासनगर, विक्रमगड, वाडा 3 प्रत्येकी , अंबरनाथ, डहाणू, कल्याण, पनवेल, पेन, उरण 2 प्रत्येकी, अलिबाग, भिवंडी, मुंबई (सांताक्रूझ), मुरबाड, मुरुड, ठाणे 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 21, राधानगरी 19, चांदगड 15, आजारा 12, गगनबावडा 11, शाहूवाडी 9, गारगोटी, पन्हाळा 8 प्रत्येकी, पाटण, वेल्हे 7 प्रत्येकी, पाचोरा 6, भडगाव, गडहिंग्लज, जावली मेधा 5 प्रत्येकी , भोर, इगतपुरी, कागळ कोल्हापूर, पारोळा, पौड मुळशी, त्र्यंबकेश्वर 4 प्रत्येकी, चाळीसगाव, एरंडोल, मुळदे, पेठ, सातारा, शिराळा, वडगाव मावळ, वाई, वाळवा इस्लामपूर 3 प्रत्येकी , अमळनेर, आंबेगाव घोडेगाव , चोपडा, दहीगाव, गिरना धरण , हातकणंगले, जळगाव कळवण , कराड, खेड राजगुरूनगर , नवापुर, ओझरखेडा, पंढरपूर, शिरोळ, शिरूर घोडनाडी , सुरगाणा 2 प्रत्येकी, अक्कलकोट, अक्कलकुवा, अकोले, भुसावळ, बोडावद, चांदवड, दौंड, देवला, धरणगाव, हरसूल , जामनेर, जत, कडेगाव, कवठे महाकाल, खंडाळा बावडा, कोरेगाव, मिरज, मोहोळ, नेवासा, ओझर (नाशिक), पळूस, पुणे (लोहगाव), रावेर, सांगली, सतना बागलाण, सोलापूर, तळोदा, तासगाव, विटा, यावल 1 प्रत्येकी.

मराठवाडा : हिमायतनगर 8, किनवट, माहूर 7 प्रत्येकी, भोकरदन 6, औंधा नागनाथ, धर्मबाद, हदगाव, कळमनुरी, मंठा 5 प्रत्येकी, अर्धापूर, बदनापूर, हिंगोली, जिंतूर, सेनगाव, सोयगाव, उमारी 4 प्रत्येकी, औरंगाबाद, बिलोली, जाफराबाद, कन्नड, मुदखेड , नांदेड 3 प्रत्येकी, देवणी, जालना, खुलताबाद, पूर्णा, सेलू, सिल्लोड, वसमत 2 प्रत्येकी, अहमदपूर, अंबड, औसा, चाकूर, देगलूर, गंगापूर, घनसावंगी, जळकोट, कैज, लातूर, लोहा, लोहारा, मनवत, नायगाव खैरगाव, परभणी, परतूर, पाथरी, फुलंब्री, शिरूर अनंतपाल, तुळजापूर, उमरगा 1 प्रत्येकी.

विदर्भ : सिरोंचा 8, अहीरी, महागाव 6 प्रत्येकी, पुसद, उमर खेड  प्रत्येकी, एटापल्ली, कोरपना, रिसोड, सिंधखेड राजा 4 प्रत्येकी, आर्णी, भामरागड, चिखली, दिग्रस, जिवती, लोणार, मनोरा, पंढरीकेवडा, सालेकसा, वाशिम, झरी झमनी 3 प्रत्येकी, आमगाव, बल्लारपूर, चंद्रपूर, गोंदिया, गोंड पिपरी, मालेगाव, मेहकर, मूल चेरा, राजुरा 2 प्रत्येकी, अकोला, बाभुळगाव, बार्शी टाकळी, भद्रावती, बुलढाणा, चामोर्शी, चिखलदरा, देऊळगाव राजा, देवरी, धानोरा, धारणी, घाटंजी, गोरेगाव, कारंजा लाड, कोरची, मंगळुरपीर, मारेगाव, पातूर, पोंभुणी, सडक अर्जुनी, साकोली, संग्रामपूर, साओली, शिंदेवाही, तेल्हारा, वणी, वरोरा, यवतमाळ 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा) 32, शिरगाव 21, दावडी 19, ताम्हिणी 17, कोयना(पोफळी) 13, डोंगरवाडी 11, अम्बोणे 10, लोणावळा(टाटा) 6, लोणावळा(ऑफिस), वळवण, खोपोली, खंद, वाणगाव 5 प्रत्येकी, ठाकूरवाडी 4, शिरोटा 3, भिवपुरी 1,

पुढील हवामानाचा अंदाज:

18-19 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

20-21 ऑगस्ट : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

18 ऑगस्ट : मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासहित अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

19 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

20 ऑगस्ट :  विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

21 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.