Chandani Chowk Accident : रस्ता ओलांडत असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – चांदणी चौकात रस्ता (Chandani Chowk Accident) ओलांडत असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 31) मध्यरात्री घडली.

राम प्रेमदास राठोड (वय 26, रा. पिरंगुट, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिथुन बंडू जाधव (वय 29, रा. ठाणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा राम हा सोमवारी मध्यरात्री पावणे तीन वाजताच्या सुमारास चांदणी चौकातून पायी चालत जात होता.

Somatane Toll plaza : सोमाटणे टोलनाका हटविण्यासाठी पुढील लढाई न्यायालयामार्फतच – किशोर आवारे

तो रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव वेगाने आलेल्या (Chandani Chowk Accident) अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात राम गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.