Pune : शिवसेना-भाजप युतीबाबत आशावादी – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांची मैत्री आहे. आम्हा दोघांचे रक्त व हिंदुत्व समान आहे़. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

मंगळवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही शिवसेना – भाजप एकत्र येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांनतर पाटील यांनी युती संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पुण्यात कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नाराज असले तरी ते पक्ष सोडून जाणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या मेळाव्याला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पक्ष वाढविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.