Pimpri : सहाय्यक आयुक्ताच्या नावात बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर रूजू झालेले सहाय्यक राज्यकर आयुक्त सुनील वाघमारे यांनी आपल्या नावात बदल केला आहे. त्यांचे नवीन नाव आता सुनील अलमेलकर असे आहे. सोलापूर येथील राज्यकर कार्यालयाच्या आस्थापना अधिका-यांनी या नाव बदलाची माहिती महापालिका आयुक्तांना दिली आहे. त्यानुसार, महापालिका कामकाजात आता सुनील वाघमारे यांचे नाव सुनील अलमेलकर असे बदलण्यात आले आहे.

पिंपरी पालिकेत 11 सहाय्यक आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी असा कोटा आरक्षित आहे.  पिंपरी महापालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे भांडार विभागाचे मंगेश चितळे, नागरवस्ती विभागाच्या स्मिता झगडे, आकाश चिन्ह परवाना विभागाचे सुनील अलमेलकर कार्यरत आहेत. तर, महापालिकेतील प्रशासन विभागाचे मनोज लोणकर, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे चंद्रकांत इंदलकर, ‘अ’  प्रभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ब’  प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, ‘क’  प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत.

सोलापूरचे राज्यकर विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील वाघमारे यांची 26 जुलै रोजी 2019 रोजी पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. प्रतिनियुक्तीवर ते महापालिकेत रूजू झाले आहेत.  वाघमारे यांनी आपल्या नावात बदल केला आहे. त्यांचे नवीन नाव आता सुनील अलमेलकर असे आहे. सोलापूर येथील राज्यकर कार्यालयाच्या आस्थापना अधिका-यांनी या नाव बदलाची माहिती महापालिका आयुक्तांना दिली आहे. त्यानुसार, महापालिका कामकाजात आता सुनील वाघमारे यांचे नाव सुनील अलमेलकर असे बदलण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.