PCMC : महापालिका स्थापत्य अधिका-यांच्या कामकाजातही फेरबदल

एमपीसी न्यूज  – पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह स्थापत्य विभागातील अधिका-यांच्या कामकाजाचेही फेरवाटप (PCMC)  केले आहे.

शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण, महापालिका व स्मार्ट सिटी कार्यक्षेत्रांर्गत सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे अ, ब, क, इ, फ, ग क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य, श्रीकांत सवणे यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग सोपविला आहे. तसेच महापालिकेत (PCMC)  स्थापत्य प्रकल्प नव्याने सुरु करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे सह शहर अभियंता प्रकल्प या पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.

Municipal Council Elections : नगरपरिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर;29 हजार 401 पुरुष मतदार; 27 हजार 500 महिला मतदार

महापालिकेत नव्याने कार्यान्वीत होणारे विशेष प्रकल्प, सद्यस्थितीत सुरु असलेले बीआरटीएस, इतर प्रकल्पांसह, वाहतूक नियोजन, महापालिका शाळा व दवाख्यान्यांतर्गत असणारे संपूर्ण स्थापत्य विषयक कामकाज ओंभासे यांच्याकडे सोपविले आहे. महापालिका शाळा, दवाखान्यांतर्गत असणारे संपूर्ण स्थापत्य विषयक कामकाजावर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचे तर बीआरटीएस व वाहतूक नियोजन विषयक कामकाजावर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांचे नियंत्रण राहणार आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे स्मार्ट सिटीसह ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील आबासाहेब ढवळे यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाचे अनिल शिंदे यांच्याकडे ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाचे किशोर महाजन यांच्याकडे जलनि:सारण, दक्षता व गुणनियंत्रणचे शिरिष पोरेड्डी यांच्याकडे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय,  बीएसयूपी, ईड्ब्लयूस, पीएमएवाय, स्थापत्य प्रकल्प, देवन्ना गठ्टूवार यांच्याकडे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, पाणीपुरवठा सबंधित प्रकल्प, प्रशांत पाटील यांच्याकडे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य प्रकल्प दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.