Municipal Council Elections : नगरपरिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर;29 हजार 401 पुरुष मतदार; 27 हजार 500 महिला मतदार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सन 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीची  (Municipal Council Elections) अंतिम मतदार यादी मंगळवारी (दि. 5) मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी प्रसिध्द केली. यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार 56 हजार 901 एकूण मतदार आहेत. त्यात 29 हजार 401 पुरुष मतदार असून 27 हजार 500 महिला मतदार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर इच्छुकांनी मतदार यादी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.     

 

शासनाच्या आदेशान्वये तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून प्रथम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यांनतर प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक जणांनी आक्षेप घेतले व दि. 5 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. याबाबत सर्व माहिती उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.

 

Deepak Phalle: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या अध्यक्षपदी दीपक फल्ले व सेक्रेटरीपदी सुरेश शेंडे

 

 

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सर्व 14 प्रभागामधून एकूण मतदान, पुरुष मतदार. महिला मतदार पुढील प्रमाणे.- प्रभाग क्र 1- एकूण मतदान- 4780, पुरुष मतदार – 2602, महिला मतदार – 2178, प्रभाग क्र – 2 – एकूण मतदान – 4593 ,पुरुष मतदार – 2453, महिला मतदार – 2130, प्रभाग क्र –3 – एकूण मतदान – 4487, पुरुष मतदार – 2253, महिला मतदार – 2234 , प्रभाग क्र – 4 – एकूण मतदान – 4684, पुरुष मतदार – 2424, महिला मतदार – 2259,  प्रभाग क्र – 5 – एकूण मतदान- 3430, पुरुष मतदार – 1732, महिला मतदार – 1693,  प्रभाग क्र – 6 – एकूण मतदान – 3460, पुरुष मतदार – 1839, महिला मतदार – 1621, प्रभाग क्र – 7 – एकूण मतदान – 3691, पुरुष मतदार – 1878, महिला मतदार – 1813, प्रभाग क्र – 8 – एकूण मतदान -3941, पुरुष मतदार – 2092, महिला मतदार – 1849,  प्रभाग क्र – 9 – एकूण मतदान- 4630, पुरुष मतदार – 2332, महिला मतदार –2298, प्रभाग क्र – 10 – एकूण मतदान- 3197, पुरुष मतदार – 1597, महिला मतदार – 1600,  प्रभाग क्र – 11 – एकूण मतदान- 4294, पुरुष मतदार – 2186, महिला मतदार – 2108,  प्रभाग क्र – 12 – एकूण मतदान – 4018, पुरुष मतदार – 2023, महिला मतदार – 1995, प्रभाग क्र – 13 – एकूण मतदान- 4244, पुरुष मतदार – 2187, महिला मतदार –2057,  प्रभाग क्र – 14 – एकूण मतदान- 3462, पुरुष मतदार – 1802, महिला मतदार – 1660

 

Alandi News: महिलेस लग्नाचे आमिष दाखवून केली 15 लाख रुपयांची फसवणूक

 

 

या प्रमाणे प्रभाग निहाय मतदारांची संख्या असून प्रारूप ,अतदार याद्या (Municipal Council Elections)  प्रसिध्द केल्यानंतर संस्था,पक्ष,संघटना व इच्छुक उमेदवारांनी घेतलेले आक्षेपाच्या नुसार बदल केले कि नाही, याची पडताळणी सुरु असून निवडणुका नक्की कधी होणार याबाबत चर्चा सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.