Dehuroad : देहूरोडमधून 50 हजारांचे चरस जप्त

एमपीसी न्यूज – देहूरोड (Dehuroad ) परिसरातून देहूरोड पोलिसांनी सुमारे 50 हजारांचे चरस जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

Talegaon Dabhade : गुणवंत विद्यार्थ्यांसह 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान

विजय किशन छत्री (वय 43, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत पवार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय छत्री याने त्याच्या ताब्यात 49 हजार 800 रुपये किमतीचा चरस हा अमली पदार्थ बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विजय छत्री याला ताब्यात घेत त्याच्याकडून चरस जप्त केले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.