Talegaon Dabhade : गुणवंत विद्यार्थ्यांसह 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील मराठी माध्यमांच्या (Talegaon Dabhade) शाळांमधील दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांचे मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ, कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब ऑफ व तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ रविवार (दि. 9) मावळ तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला.

Chakan: हिरवी मिरची, बटाटा व टोमॅटोचे भाव तेजीत

तसेच 100 टक्के निकाल लावलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. तालुक्यातील शाळांमधील 65 विद्यार्थी सहभागी झाले. तसेच तालुक्यातील मराठी माध्यमांच्या 100 टक्के निकाल लावलेल्या 15 मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमासाठी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार (Talegaon Dabhade) भगवानराव साळुंखे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश काशिद, जिल्हा कार्यवाह महेश शेलार, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, शिक्षक परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आगळमे,रोटरी क्लब ऑफ 3131चे उपप्रांतपाल शंकरगौडा हदिमनी, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माळशिकारे सर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सीचे अध्यक्ष राहुल खळदे,सचिव रो. सुनिल खोल्लम, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारिठे, कोषाध्यक्ष राजेंद्र भांड,सहकार्यवाह रियाज तांबोळी,रो. ममता कोल्हटकर. उपप्रांतपाल  रो. शंकर हदिमणी, रो. सुनील नाना भोंगाडे, रो.हिरामण बोत्रे,रो.सुदाम दाभाडे,रो.विन्सेंट सालेर, रो. अजय पाटील, सल्लागार  विलास भेगडे,धनंजय नांगरे,नारायण असवले,संजय वंजारे,रविंद्र शेळके,आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की,या पुढील शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून आपल्या आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करून देशाचा नावलौकिक वाढवावा.

अध्यक्ष पदावरून बोलताना आमदार भगवानराव साळुंके म्हणाले की, शिक्षकांनी नेहमी अद्यावत ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे पवित्र काम करा असा मोलाचा संदेश दिला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसचे उत्तम कामाबद्दल अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ (Talegaon Dabhade) व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

Akurdi : माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे सहकारमध्ये उल्लेखनीय काम –  इरफान सय्यद

प्रास्ताविक लक्ष्मण मखर यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे व प्रभा काळे यांनी केले. रोटरीचे अध्यक्ष राहुल खळदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.