Charoli Crime News : व्हॉटस्अपवरून ऑनलाईन मटका घेणाऱ्यांवर कारवाई, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – व्हॉटस्अपवरून ऑनलाईन पद्धतीने कल्याण व मिलन मटका घेणा-या तीन जणांवर दिघी पोलीसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 11 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास च-होली फाटा याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

रोहन एकनाथ तापकीर (वय 29, रा. च-होली ), महेश हरिशचंद्र नर्हे (वय 29, रा. च-होली) व आकाश शंकर तापकिर (वय 28, रा. च-होली ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सीआरपीसी 14 (अ) (1) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्हॉटस्अपवरून ऑनलाईन पद्धतीने कल्याण व मिलन मटका घेत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 11 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एच. एम. आव्हाड अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.