Chennai : माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन

एमपीसी न्यूज- भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे आज रात्री चेन्नई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते  86 वर्षांचे होते.

_MPC_DIR_MPU_II

शेषन हे 12  डिसेंबर 1990  ते 11 डिसेंबर 1996 या कालावधीत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. निष्पक्ष व निर्भिड वातावरणात निवडणुका होण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळात निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करून त्यांनी संपूर्ण देशात निवडणूक आयोगाचा वचक निर्माण केला. त्याच्या कडक स्वभावामुळे अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे वाद झाले, मात्र कशाने डगमगून न जाता शेषन यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करून स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.