Chikhali : दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला मारहाण

Beating a married woman to bring two lakh rupees : पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘दोन लाख रुपये घेऊन ये नाहीतर नांदवणार नाही’, असे म्हणत 21 वर्षीय विवाहित महिलेला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. ही घटना जानेवारी 2019 ते जून 2020 दरम्यान घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी (दि.24) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विवाहित महिलेच्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आकाश भिमराव केंगार ( वय. 26, रा. भोईटे नगर, मानाची बाग, पुणे), भिमराव संभाजी केंगार (वय.55), अनुसया भिमराव केंगार (वय.50), अतिष भिमराव केंगार (वय. 25), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेला आरोपी पती आकाश व इतर आरोपी शिवीगाळ व मारहाण करायचे. तसेच, दोन लाख रूपये घेऊन ये नाहीतर नांदवणार नाही असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ करायचे.

याप्रकरणी अधिक तपास चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दगडे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.