1st To 12th Syllabus : पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Curriculum I to XII will be reduced by 25 per cent - Education Minister Varsha Gaikwad :कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.  

एमपीसी न्यूज – पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. अजून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत त्यामुळे मुलांच्या मनात  तणाव राहू नये व दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे  मंत्री  गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या,  शैक्षणिक वर्ष 2020 -21 साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च 2020 पासून राज्यामधली सगळी शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.

दरवर्षी साधारणतः जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. 2020-21 या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, त्यांचं स्वरुप ऑनलाइन, टीव्हीच्या माध्यमातून होतं.

मात्र, मुलांवर, विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी 15 जूनला राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण व दडपण नको म्हणून 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.