Chikhali : अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 30) रात्री दहाच्या सुमारास देहू मोशी रस्त्यावरील लक्ष्मी चौकात घडला.

दिलीप हंबीर (वय 44, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश बापू हंबीर (वय 38, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंबीर नेहमीप्रमाणे कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.