Chikhali Crime News : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत छळ; सासरच्या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेवर पतीने अनैसर्गिक संभोग केला. सासरच्या लोकांनी विवाहितेच्या दुधात गर्भपाताच्या गोळ्या टाकून तिचा तीन वेळा गर्भपात केला. तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे.

विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती, सासू, सासरे, मोठा दीर, नणंद, नंदावा आणि मावस दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 मे 2019 ते 12 मार्च 2021 या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती याने विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग केला. सासरच्या लोकांनी विवाहीतेकडे माहेरहून दुधाच्या व्यवसायासाठी पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. विवाहितेला दुधामधून गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा तीन वेळेला गर्भपात केला. विवाहितेच्या आई-वडिलांना मारहाण करून त्यांचा अपमान केला. विवाहितेला नांदवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.