Pimple Gurav News: बेघरांसाठी आरक्षित जागेवर पाण्याची टाकी बांधणार

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील वैदुवस्ती-भैरवनाथनगर, गणेशनगर आणि सुदर्शननगर परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या ‘बेघरांसाठी घरे’ या आरक्षित जागेवर पाण्याची उंच टाकी बांधण्यात येणार आहे.

पिंपळे-गुरव (प्रभाग क्रमांक २९) येथील वैदुवस्ती – भैरवनाथनगर, गणेशनगर, आणि सुदर्शननगर परिसर हा भौगोलीकदृष्ट्या उंचावर असल्याने या ठिकाणी नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. परिसरात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी उंच पाण्याची टाकी बांधणे आवश्यक आहे. परंतु, सद्यस्थितीत या भागात मोकळी जागा उपलब्ध नाही.

त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या ‘बेघरांसाठी घरे’ या आरक्षित जागेमध्ये पाण्याची उंच टाकी बांधण्यात येणार आहे. तसेच नवी सांगवी (प्रभाग क्रमांक 31) परिसरातही नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणवत आहेत.

त्यामुळे या परिसरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेच्या आरक्षणावर पाण्याची उंच टाकी बांधण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.