Chikhali: पाच लाखांसाठी विवाहीतेचा छळ; पती, सासू, नणंदवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ड्रायव्हींग स्कूल सुरू करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंदसह सहाजणांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शरदनगर, चिखली येथे ही घटना घडली आहे.

पती सोमनाथ रामकृष्ण सामटकर, सासू सरस्वती रामकृष्ण सामटकर, नणंद मालू लुडेकर, वैशाली रविंद्र लुडेकर, रविंद लाडूकर आणि रुपा हरणे (सर्व रा. पंचवटी हौसिंग सोसायटी, हनुमान मंदिराजवळ, शरदनगर, चिखली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, आरोपी पती, सासू, नणंदेसह अन्य व्यक्तींनी पिडीत विवाहीतेकडे पतीच्या मोटार ड्रायव्हींग स्कूलसाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. त्यास नकार दिल्यामुळे 1 सप्टेंबर 2019 ते 1 जानेवारी 2017 या कालावधीत विवाहीतेला मारहाण करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.

याप्रकरणी संबंधित पिडीत विवाहीतेने 25 जानेवारी 2019 रोजी यवतमाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपासासाठी झिरो नंबरने ही फिर्याद चिखली पोलिस ठाण्याकडे वर्ग केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.